Thursday, 16 August 2018

20 Animals and their homes: – (20 प्राणी आणि त्यांची घरे)



1. Lion – Den – (सिंह – गुहा)

2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल)

3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ)

4. Sheep – Pen – (मेंढी – कोंडवाडा)

5. Bull – Cattle shed – (बैल –  गोठा)

6. Elephant – Jungle – (हत्ती – जंगल)

7. Hen – Coop – (कोंबडी – खुराडे)

8. Snake – Hole/ Burrow – (साप – बीळ)

9. Horse – Stable – (घोडा – तबेला)

10. Cow – Cattle shed – (गाय – गोठा)

11. Bird – Nest – (पक्षी – घरटे)

12. Monkey – Trees – (माकड – झाडे/ वृक्ष)

13. Pig – Sty – (डुक्कर – डुक्करवाडा)

14. Rabbit – Burrow – (ससा – बीळ)

15. Fish – Water (Pet fish live in aquariums) – (मासे –
पाणी(पाळलेले मासे  मत्सालयामध्ये/काचेच्या पेट्यांमध्ये राहतात)

16. Donkey – Stable – (गाढव – तबेला)

17. Goat – Pen – (शेळी/बकरी – कोंडवाडा)

18. Bee – Hive – (मधमाशी – मधमाशांचे पोळे)

19. Spider – Web/Cobweb – (कोळी – जाळे/ कोळ्यांचे जाळे)

20. Ant – Hill – (मुंगी – वारूळ)

Friday, 27 July 2018

मराठी व्याकरण. वर्णमाला


वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

      मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
         अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

    स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
              अ, इ, ऋ, उ


2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

    स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
                 अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ

2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
                  अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
               याचे 4 स्वर आहेत.
               ए - अ+इ/ई
               ऐ - आ+इ/ई
               ओ - अ+उ/ऊ
               औ - आ+उ/ऊ

2. स्वरादी :  ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
            स्वर + आदी - स्वरादी
            दोन स्वरादी - अं, अः
            स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  दोन नवे स्वरदी : ओ, औ
  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
          ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
          व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)

1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण
2. मृदु वर्ण
3. अनुनासिक वर्ण

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ
                  त, थ
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
                  उदा. ड, त्र, ण, न, म      

शालेय प्रकल्प


शालेय प्रकल्प

#प्रकल्प म्हणजे काय ?


विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे :-

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.

2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –

@( विद्यार्थ्यांसाठी )

1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.

2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.

3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.

4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.

5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.

6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.

7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.

8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.

9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.

10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.

## पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी:-

भाषा -:

* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Thursday, 31 May 2018

online पेपर कसा बनवायचा व सोडवायचा

१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the generation असे type करा.

२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा.

३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा.

४)त्यांनतर add a question या option वर click करा.

५)multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला.

६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा.

७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 68795 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा.

८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका. for ex.महेश

९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून submit करेल.

विद्यार्थी response check  करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report option वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेलया प्रश्न गोषवारा आपणास मिळेल.

चला तर मग techno teachers बनूया
प्रगत महाराष्ट्र घडवूया

 

Sunday, 4 March 2018

दफ्तराचे ओझे- समस्या व उपाय

सामान्यतः मुलांच्या वयाच्या 10 टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे, असे अपेक्षित आहे; मात्र 12 वर्षांच्या मुलांच्या दप्तराचे ओझे 30 टक्के, म्हणजे साडेतीन किलो असते, असेही समितीला आढळून आले आहे.

🔆 राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशी 🔆

👉 मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सत्रनिहाय कमी पानांची एकत्रित पुस्तके काढावीत.

👉 एका दिवशी केवळ दोन किंवा तीन विषयांच्या तासिका असाव्यात.

👉 शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (घर आणि शाळेसाठी) करावेत.

👉 संगणकाद्वारे अभ्यास करावा.

👉 क्रीडा साहित्य शाळेनेच द्यावे आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी पुरवावे.

🔆अहवालातील निष्कर्ष🔆

👉 ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, शहरांत जास्त

👉 सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड

👉 मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम

👉 10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास

👉 12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास

🔆 इतर शिफारसी 🔆

👉 दोन किंवा तीन महिन्यांच्या सत्रानुसार लहान पुस्तके छापावीत

👉 भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी

👉 बालभारतीने पुस्तक छपाईसाठी वजनाला हलका कागद वापरावा.

👉 गृहपाठाच्या वह्या दोन-तीन विषयांसाठी एकत्रित कराव्यात

👉 200 ऐवजी 100पानी वा त्याहूनही कमी पानांच्या वह्या घ्याव्यात

👉 जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालावी

👉 गृहपाठाचे विषयनिहाय साप्ताहिक वेळापत्रक करावे

👉 वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करून त्या वर्गातच जमा कराव्यात

👉 वेळापत्रकात दररोज केवळ तीन विषयांच्या तासिका असाव्यात

👉 कमी तासिकांमुळे वह्या व पुस्तके कमी लागतील

👉 स्वाध्याय, गाईड, मार्गदर्शक पुस्तके शाळेत आणू नयेत

👉 सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे

👉 संगणकाद्वारे ई-लर्निंगवर भर द्यावा

👉 पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास व्हावा

👉 ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्‍टर अशी डिजिटल क्‍लासरूम व्यवस्था

👉 बालभारतीच्या संकेतस्थळावर पुस्तके उपलब्ध करून द्यावीत

👉 शैक्षणिक संकेतस्थळे आणि साहित्याचा उपयोग करावा

🔆शाळांसाठी सूचना🔆

👉 वह्या व पुस्तके शक्‍यतो शाळेतच ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच करून एक शाळेत व एक घरी ठेवावा

👉 वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत कपाटे, लॉकर ठेवावेत

👉 क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे.

Friday, 16 February 2018

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.emergingedtech.com

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in  

ई-ल.साहित्य

गणित विषयासाठी

�� "King of Math" - https://play.google.com/store/apps/details…

�� "Math tips and tricks" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Aptitude Test and Preparation" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Vedic Math Tricks - 24by7exams" - https://play.google.com/store/apps/details?id=com.

��multiplicationtable
tion Table" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Greater than, Less than" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Addition Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Subtraction Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Roman Numerals" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Division Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Equations" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "How Many ... ?" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Numbers" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Math Formulary" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Complete Mathematics" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Clock Learning" - https://play.google.com/store/apps/details?id=net.abe3.clock

�� Check out "Math Challenge - Brain Workout" - https://play.google.com/store/apps/details…

व्हिडीओ निर्मितीसाठी

��"Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"KineMaster – Pro Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"VideoShow: Video Editor &Maker" - https://play.google.com/store/apps/details…

��"AndroVid Video Editor" - https://play.google.com/store/apps/details?id=com.androvid

��"Magisto Video Editor & Maker" - https://play.google.com/store/apps/details?id=com.magisto

��"Mix Audio With Video" - https://play.google.com/store/apps/details…

��"Movie Maker - Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"VideoFX Music Video Maker" - https://play.google.com/store/apps/details?id=com.videofx

��"Photo and Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"Video Editor by Live Oak Video" - https://play.google.com/store/apps/details…

��"Reverse Movie FX - magic video" - https://play.google.com/store/apps/details…

��"VidTrim - Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"Slideshow video editor" - https://play.google.com/store/apps/details…
 

PPT कशी बनवावी

संगणकावर PPT कशी बनवावी ?

1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा.

2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा.

3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका.

4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा.

5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.

6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.

7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.

8) आता आपण अॅनिमेशन देऊ.
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजूला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन द्या अशा प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
 यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ.
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता

प्रगत शाळा 25 निकष


*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष*

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...