Friday, 16 February 2018

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.emergingedtech.com

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in  

ई-ल.साहित्य

गणित विषयासाठी

�� "King of Math" - https://play.google.com/store/apps/details…

�� "Math tips and tricks" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Aptitude Test and Preparation" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Vedic Math Tricks - 24by7exams" - https://play.google.com/store/apps/details?id=com.

��multiplicationtable
tion Table" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Greater than, Less than" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Addition Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Subtraction Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Roman Numerals" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Division Tables" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Equations" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "How Many ... ?" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Numbers" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Math Formulary" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Complete Mathematics" - https://play.google.com/store/apps/details…

�� Check out "Clock Learning" - https://play.google.com/store/apps/details?id=net.abe3.clock

�� Check out "Math Challenge - Brain Workout" - https://play.google.com/store/apps/details…

व्हिडीओ निर्मितीसाठी

��"Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"KineMaster – Pro Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"VideoShow: Video Editor &Maker" - https://play.google.com/store/apps/details…

��"AndroVid Video Editor" - https://play.google.com/store/apps/details?id=com.androvid

��"Magisto Video Editor & Maker" - https://play.google.com/store/apps/details?id=com.magisto

��"Mix Audio With Video" - https://play.google.com/store/apps/details…

��"Movie Maker - Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"VideoFX Music Video Maker" - https://play.google.com/store/apps/details?id=com.videofx

��"Photo and Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"Video Editor by Live Oak Video" - https://play.google.com/store/apps/details…

��"Reverse Movie FX - magic video" - https://play.google.com/store/apps/details…

��"VidTrim - Video Editor" - https://play.google.com/store/apps/details…

��"Slideshow video editor" - https://play.google.com/store/apps/details…
 

PPT कशी बनवावी

संगणकावर PPT कशी बनवावी ?

1) प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा.

2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा.

3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका.

4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा.

5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.

6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.

7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.

8) आता आपण अॅनिमेशन देऊ.
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजूला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन द्या अशा प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
 यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ.
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता

प्रगत शाळा 25 निकष


*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष*

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

Thursday, 15 February 2018

पालक शिक्षक संघ-मार्गदर्शक तत्त्वे

अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक  
उपाध्यक्ष --पालकांमधून एक
सचिव -- शिक्षकांमधून एक
सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
सदस्य -  प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षकप्रत्येक तुकडीसाठी  एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
समितीत ५०%महिला सदस्य
समितीची मुदत २ वर्षे
बैठक २ महिन्यातून किमान एकदा

पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय २४ ऑगस्ट २०१० रोजी शासनाने घेतला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा तसेच अन्य शिक्षण मंडळाशी (सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. आणि आय.बी.) संलग्न असलेल्या शाळांना या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च

माध्यमिक शाळा या राज्यात कार्यरत असलेल्या राज्य शिक्षण मंडळाशी व अन्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांनी शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पालक-शिक्षक संघ स्थापन करणे बंधनकारक आहे.
पालक-शिक्षक संघाची कर्तव्ये- 
पालक-शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे. त्यांनी शाळेच्या दैनंदिन कामकाज व प्रशासनात लक्ष घालणे अपेक्षित नाही.• शैक्षणिक शुल्क निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक असल्याने त्यासंदर्भात पालक-शिक्षक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.• आता प्रत्येक शाळेमध्ये पालक-शिक्षक संघ स्थापन करणे अनिवार्य आहे.• तथापि, ज्या शाळांमध्ये अशा संघाची स्थापना अद्याप झालेली नसेल त्या शाळांमध्ये अशा संघाची स्थापना करण्यात यावी.• पालक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक – शिक्षक संघाचे कार्यकारी समितीची निवड शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पालक-शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार असून या बैठकीसाठी सर्वसाधारण सभेच्या एकूण सभासदांपैकी ५० टक्के सभासद उपस्थित असणे अनिवार्य आहे. • कार्यकारी समितीवर प्रतिनिधीत्वासाठी जास्त उमेदवार उत्सुक असतील तर उमेदवाराची निवड सोडत पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून दोन आठवडय़ात करुन पारदर्शी पद्धतीने कार्यकारी समिती दोन आठवडय़ात गठीत करण्यात येईल.• या समितीमधील सदस्यांमध्ये ५० टक्के महिला सदस्य असतील. • पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या नावाची यादी शाळेच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. • सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी पालक-शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांच्या आत सभासदांची आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या नावाची यादी संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करावयाची आहेत. • कार्यकारी समितीची मुदत दोन वर्ष असून कोणत्याही पालकास एकदा पदाधिकारी अथवा कार्यकारी समितीचा सदस्य झाल्यानंतर त्यानंतरच्या पाच वर्षात पदाधिकारी अथवा कार्यकारी समितीचा सदस्य होता येणार नाही.  कार्यकारी समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा घेतली जाणार आहे तसेच पालक-शिक्षक संघाच्या वर्षातून दोनदा बैठका घेतल्या जाणार असून प्रत्येक बैठक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. • 

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...