Saturday, 23 February 2019

भिन्न अर्थ सांगणारे समान शब्द एका वाक्यात

मराठीही फारशी सोपी नाही. बरं का...!!!👍👍

  1. म्हणे "शिरा" खाल्ल्याने  "शिरा" आखडतात.
  2. "काढा" पिऊन मग एक झोप "काढा".
  3. "हार" झाली की "हार" मिळत नाही
  4. एक "खार" सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर "खार" खाऊन आहे.
  5. "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे "पळ".
  6. "पालक" सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, "पालक" . पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
  7. "दर" वर्षी काय रे "दर" वाढवता..??
  8. भाव" खाऊ नकोस, खराखरा "भाव" बोल.
  9. नारळाचा "चव" पिळून घेतला तर त्याला काही "चव" राहत नाही.
  10. त्याने "सही" ची अगदी "सही* *सही" नक्कल केली.
  11. "वर" पक्षाची खोली "वर" आहे.
  12. खोबर्‍यातला मुलांचा "वाटा" देऊन मग बाकीच्याची चटणी "वाटा".
  13. विधान" सभेतील मंत्र्यांचे "विधान" चांगलेच गाजले.
  14. फाटलेला शर्ट "शिवत" नाही तोपर्यंत मी त्याला "शिवत" नाही.
  15. भटजी म्हणाले, "करा" हातात घेऊन विधी सुरू "करा".
  16. धार्मिक "विधी" करायला कोणताही "विधी" निषेध नसावा.
  17. अभियंता मला म्हणाला, इथे "बांध* *बांध"
  18. उधळलेला "वळू" थबकला, मनात म्हणाला, इकडे "वळू" कि तिकडे "वळू".
  19. कामासाठी भिजवलेली "वाळू" उन्हाने "वाळू" लागली.
  20. दरवर्षी नवा प्राणी "पाळत" मी निसर्गाशी बांधिलकी "पाळत" असतो.
  21. फुलांच्या "माळा" केसांत "माळा".
  22. गाईलाचारादेण्याशिवायचारानव्हता.
  23. वाटशोधण्यास मदत व्हावी म्हणून तो मित्राचीवाटपाहत होता.
  24. बोटउचलतानाबोटकापले.
  25. नावचालवणाऱ्याचे “नाव” काय ?
  26. त्यालावीटउचलण्याचावीटआलाय.
  27. वर”- वधू टेबलावरठेवलेल्या देवाच्या मूर्तीपुढे उभे राहताच देवाने हातवरकरूनवरदिला.
  28. तळहातावरीलतीळदिसू नये म्हणून तिने पांढरेतीळठेवले.
  29. नजरलागू नये म्हणूननजरहटवली.
  30. परीक्षेच्यावेळीतापआला तर डोक्याला विनाकारणतापहोईल.
  31. फक्त एकतासउरला आहे, अजून अर्धेहीतासकाम झाले नाही.
  32. पाठकरायला बसलो आणि माझीपाठदुखायला लागली.
  33. लाकडावरचुकामारताना तरीचुकाकरू नकोस.
  34. पाटावरबसून तोपाटाकडेबघत होता.
  35. राजकीयपक्षकोणाचापक्षधेतील कुणास ठाऊक?
  36. आधीखणमगखणउघड आणिखणआत ठेव.
  37. राजकन्येचापणसाधा होतापणकोणालाच पूर्ण करता आला नाही.
  38. सरदारानेविडाखाणार त्याला शिक्षा करणार असाविडाउचलला.
  39. लिहिताना टेबलावरीलपानउडाले आणि अलगदपणे कुंडीतीलपाना अडकले.
  40. कविता वाचण्यातरसनाही पणरसप्यायला आवडतो.
  41. पिता”-पुत्र पाणीपितायावे म्हणून नदीकाठी गेले.
  42. थंडहवावाहत होती पण मला पाऊसचहवाहोता.
  43. वाचाल तरच वाचाल.
  44. खिडकीतूनलाटपाहत  पोळ्यालाट”.
  45. एकलक्षरूपयांनी सर्वांचेलक्षवेधून घेतले.
  46. ताठमानठेवून जगा , मागता मान मिळेल.
  47. पात्रमाणसाने हेपात्रउचलून नदीच्या पात्रावर जावे
  48. आकाशीचामित्रआपला खरा मित्र आहे.
  49. तू त्याबसस्थानकावर जाऊनबस”.
  50. नदीच्याकाठीपडलेलीकाठीउचलली.


डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...