मराठीही फारशी सोपी नाही. बरं का...!!!👍👍
- म्हणे "शिरा" खाल्ल्याने "शिरा" आखडतात.
- "काढा" पिऊन मग एक झोप "काढा".
- "हार" झाली की "हार" मिळत नाही.
- एक "खार" सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर "खार" खाऊन आहे.
- "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे "पळ".
- "पालक" सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात मेथी, "पालक" इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
- "दर" वर्षी काय रे "दर" वाढवता..??
- “भाव" खाऊ नकोस, खराखरा "भाव" बोल.
- नारळाचा "चव" पिळून घेतला तर त्याला काही "चव" राहत नाही.
- त्याने "सही" ची अगदी "सही* *सही" नक्कल केली.
- "वर" पक्षाची खोली "वर" आहे.
- खोबर्यातला मुलांचा "वाटा" देऊन मग बाकीच्याची चटणी "वाटा".
- “विधान" सभेतील मंत्र्यांचे "विधान" चांगलेच गाजले.
- फाटलेला शर्ट "शिवत" नाही तोपर्यंत मी त्याला "शिवत" नाही.
- भटजी म्हणाले, "करा" हातात घेऊन विधी सुरू "करा".
- धार्मिक "विधी" करायला कोणताही "विधी" निषेध नसावा.
- अभियंता मला म्हणाला, इथे "बांध* *बांध"
- उधळलेला "वळू" थबकला, मनात म्हणाला, इकडे "वळू" कि तिकडे "वळू".
- कामासाठी भिजवलेली "वाळू" उन्हाने "वाळू" लागली.
- दरवर्षी नवा प्राणी "पाळत" मी निसर्गाशी बांधिलकी "पाळत" असतो.
- फुलांच्या "माळा" केसांत "माळा".
- गाईला “चारा” देण्याशिवाय “चारा” नव्हता.
- “वाट” शोधण्यास मदत व्हावी म्हणून तो मित्राची “वाट” पाहत होता.
- “बोट” उचलताना “बोट” कापले.
- “नाव” चालवणाऱ्याचे “नाव” काय ?
- त्याला “वीट” उचलण्याचा “वीट “ आलाय.
- “वर”- वधू टेबला”वर” ठेवलेल्या देवाच्या मूर्तीपुढे उभे राहताच देवाने हात “वर” करून “वर” दिला.
- तळहातावरील “तीळ” दिसू नये म्हणून तिने पांढरे “तीळ” ठेवले.
- “ नजर” लागू नये म्हणून “नजर” हटवली.
- परीक्षेच्यावेळी “ताप” आला तर डोक्याला विनाकारण “ताप” होईल.
- फक्त एक “तास” उरला आहे, अजून अर्धेही “तास”काम झाले नाही.
- “पाठ” करायला बसलो आणि माझी “पाठ” दुखायला लागली.
- लाकडावर “चुका” मारताना तरी “चुका” करू नकोस.
- “पाटावर” बसून तो “पाटाकडे” बघत होता.
- राजकीय “पक्ष” कोणाचा “पक्ष” धेतील कुणास ठाऊक?
- आधी “खण” मग “खण” उघड आणि “खण” आत ठेव.
- राजकन्येचा “पण” साधा होता “पण” कोणालाच पूर्ण करता आला नाही.
- सरदाराने “विडा” खाणार त्याला शिक्षा करणार असा “विडा” उचलला.
- लिहिताना टेबलावरील “पान” उडाले आणि अलगदपणे कुंडीतील “पाना”त अडकले.
- कविता वाचण्यात “रस” नाही पण “रस” प्यायला आवडतो.
- “पिता”-पुत्र पाणी “पिता” यावे म्हणून नदीकाठी गेले.
- थंड “हवा” वाहत होती पण मला पाऊसच “ हवा” होता.
- वाचाल तरच वाचाल.
- खिडकीतून “लाट” पाहत पोळ्या “लाट”.
- एक “लक्ष” रूपयांनी सर्वांचे “लक्ष” वेधून घेतले.
- ताठ “मान” ठेवून जगा , न मागता मान मिळेल.
- “पात्र” माणसाने हे “पात्र” उचलून नदीच्या पात्रा”वर जावे
- आकाशीचा “मित्र” आपला खरा मित्र आहे.
- तू त्या “बस” स्थानकावर जाऊन “बस”.
- नदीच्या “काठी” पडलेली “काठी” उचलली.
No comments:
Post a Comment