Wednesday, 28 February 2024

प्रश्नमंजुषा

जोडशब्द लिहा.
१. वदन + परिचय असणे = तोंडओळख
२. धरणी + गेलेला =  भूमिगत
३. सोने + बिल्ला = सुवर्णपदक
४. सोबत + गंध = सहवास
५. पाणी + ढब = जीवनशैली
६. वद्य + शुभ्र = कृष्णधवल
७. सदन + कुक्कुट = घरकोंबडा
८. शंभर + पूर्वीचे एक किरकोळ नाणे = शतपावली
९. आवाज + गोड  = नादमधुर
१०. सीतावर + शर = रामबाण
११. चित्त + आवड = मनपसंत
१२. प्रभा + वर्तुळ = तेजोगोल
१३. बुद्धी + अन्न चर्वण साधन = अक्कलदाढ
१४. नजर + रस्ता = दृष्टीपथ
१५. हिरा + मोठा उत्सव = हीरकमहोत्सव
१६. पद्धत + जेवणातील एक पदार्थ = रितभात
१७. एक अवयव + दाखला = पाठपुरावा
१८. दैनंदिन + थंड =रोजगार
१९. कृत्य + कथा =  कर्मकहाणी
२०. दृष्टी + अटक = नजरकैद
२१. माफी + विनवणी = क्षमायाचना
२२. संक्रांत घटक + एक कुरकुरीत पदार्थ = तीळपापड
२३. वर्तुळाकार + सामान = गोलमाल
२४. पाच + जीव = पंचप्राण
२५. दास + डोंगर = गुलामगिरी
२६. फुलाचे नाव +  घट्ट = गुलाबजाम
२७. धान्य + जीवन = पीकपाणी
२८. देणे + साहसी = दानशूर
२९. पाच + मिठाई = पंचपक्वान्न
३०. पुत्र + जंगल = नंदनवन
३१. वारा + गिरणी = पवनचक्की
३२. तीन + घर = त्रिभुवन
३३. एकटा + भुसा = एकलकोंडा
३४. कष्ट + देणे = श्रमदान
३५. लवकर + तापट = शीघ्रकोपी
३६. चित्त + स्वतंत्र = मनमोकळा
३७. देणे + भांडे = दानपात्र
३८. भूमी + मित्र = जमीनदोस्त
३९. ओहळ + तणाव = ओढाताण
४०.  सफेद + पर्ण = गोरापान


डोके चालवा आणि कोडी सोडवा


डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...