Monday, 27 November 2017

एका शब्दाचे भिन्न अर्थ

1. कळ - वेदना, कुरापत, बटन
2. कर - टॅक्स, हात, करणे
3. जलद - लवकर, ढग
4. उत्तर- प्रश्नाचा खुलासा, एक दिशा
5. नाव - नाम,  होडी
6. अंक - आकडे, मांडी
7. मित्र - सखा, सूर्य
8. चरण - पाय, ओळ
9. लक्ष - ध्यान, लाख
10. मान - शरीराचा अवयव, मोठेपणा
11. माळा - फुलांचा हार, इमारतीचा मजला
12. पान -पर्ण, वहीचे पृष्ठ
13. मुद्रा - चेहरा, ठसा
14. साल - वर्ष, टरफल
15. वर - वरती, नवरा मुलगा, आशीर्वाद
16. दंड- बाहू, काठी, शिक्षा
17. तीर - किनारा, बाण
18.  पक्ष - राजकीय संघटना, बाजू, पंख
19. हार - फुलांची माळ, पराभव
20. पाटी - फलक, लिहिण्याचे साधन, टोपली

6 comments:

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...