उद्देश - प्रश्नपत्रिकेची जागा कृतिपत्रिकेने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांकडे इतर अवांतर विषयाचे ज्ञान असणे आवश्यक झाले आहे आणि त्यासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.
अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने असाही एक उपक्रम राबवू शकतो.
कार्य पद्धती - प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे एक पुस्तक निवडून आणावयास सांगायचे. पाच-पाच विद्यार्थ्यांचा एक असे गट करायचे. प्रत्येकाचे आपले पुस्तक वाचून झाल्यानंतर ते आपल्याच गटातील दुसऱ्यास वाचनासाठी द्यायचे व त्याचे आपण घ्यायचे असे सुरु करायचे. असे साखळी पद्धतीने वाचून झाल्यानंतर सदर पाच पुस्तकावर प्रत्येकास प्रश्नसंच करण्यास सांगून नंतर त्यावर आधारित प्रश्नमंजूषा ठेऊन सर्व विद्यार्थ्यांची एक दिवस प्रश्नोत्तर स्पर्धा घ्यायची. सर्व प्रश्नांचे उत्तरे देणाऱ्यास विशिष्ट बक्षीस द्यायचे, तेही पुस्तकी रुपात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी पुस्तके वाचनाची आवड निर्माण होईल व वेळोवेळी अशी स्पर्धा घ्यावी असे ते विनंती करू लागतील. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
मूल्यमापन - प्रश्नोत्तर स्पर्धा घेऊन मूल्यमापन करावे. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात अवांतर वाचनाची आवड निर्माण झाल्याचे आणि त्यांचे प्रश्न कौशल्य समृद्ध झाल्याचे दिसून येईल.
फलित - प्रत्येक विद्यार्थी त्याला मिळालेले पुस्तक काळजीने व बारकाईने वाचू लागतील. त्यांच्यामध्ये
अवांतर वाचनाची आवड निर्माण झाल्याचे दिसून येईल.
No comments:
Post a Comment