Monday, 4 December 2017

संधी (व्याकरण)

एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार;
उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार;
दु: + काळ = दुष्काळ.
काही उदाहरणे :
जगन्नाथ : जगत +नाथ .
गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .
सूर्योदय : सूर्य + उदय .
लंकेश्वर : लंका + ईश्वर .
जलौघ : जल + ओघ .
यशोधन : यश + धन .
महर्षी : महा +ऋषी .
विद्यार्थी : विद्या +अर्थी .
सिंहासन : सिंह + आसन .
श्रेयश : श्रेय + यश .
सूर्य+अस्त =सूर्यास्त
देव+आलय=देवालय
मही+ईश=महीश
विद्या + अर्थी=विद्यार्थी
महिला + आश्रम=महिलाश्रम
मुनि+ इच्छा=मुनीच्छा
गिरि+ईश=गिरीश
गुरु+ उपदेश=गुरूपदेश
भू+ उद्धार=भूद्धार
ईश्वर+इच्छा=ईश्वरेच्छा
चंद्र+उदय = चंद्रोदय
महा+ऋषी= महर्षी
प्रीति+अर्थ=प्रीत्यर्थ
इति+आदी=इत्यादी
अति+उत्तम=अत्युत्तम
मनु+अंतर=मन्वंतर
पितृ+आज्ञा=पित्राज्ञा
सम्+ आचार = समाचार
सम्+गती = संगती
निः+ कारण = निष्कारण
निः+पाप = निष्पाप
दुः+परिणाम = दुष्परिणाम
दुः+ कृत्य = दुष्कृत्य
सत्+ जन = सज्जन
मनः +रथ = मनोरथ
निः+ अंतर = निरंतर
दुः+ जन = दुर्जन
बहिः+अंग = बहिरंग
दुः+ शासन = दुः शासन
निः+ संदेह = निस्संदेह
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर्+ आत्मा = अंतरात्मा
प्रातः+काल = प्रातःकाल
विद्या + अर्थी = विद्यार्थी

No comments:

Post a Comment

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...