विचार निरोगी असले की सुविचार सुचतात. सुविचार जीवनात दिपस्तंभाचे कार्य करतात.......
1. जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
2. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
3. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
4. माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
5. क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
6. सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
7. मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
8. बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
9. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
10. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
11. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
12. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
13. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
14. परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
15. वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
16. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
17. संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
18. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
19. ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
20. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
21. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
22. तुलना करावी पण अवहेलना करू नये.
23. समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
24. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
25. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
26. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
27. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
28. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
29. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
30. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
31. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
32. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
33. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
34. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
35. संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
36. रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
37. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
38. मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
39. जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
40. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
41. गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
42. स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
43. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
44. आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
45. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
46. बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी वेळ काढणं गरजेचं असतं.
47. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
48. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
49. शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
50. तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
No comments:
Post a Comment