Sunday, 3 December 2017

भाषिक खेळ

भाषिक खेळ

१)-
समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.
हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल.
खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत
यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा
की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल .
उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते.
झोपडी म्हणजे घर व
दरवाजा म्हणजे दार.
1.फायदा+नुकसान
2.वडील+मुलगा
3.विवाह+काम
4.दिनांक+दिवस
5.शरीर+शिक्षा
7.राहणे+घर
याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता
येतो.
उत्तरे-1.नफातोटा
2.बापलेक
3.लग्नकार्य
4.तारीखवार
5.देहदंड
6.वसतिगृह.

२)

खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या
शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि – 1तास

उदाहरणार्थ :
मुलाचे नाव – मदन
1. गावाच नाव - फलटण
2. मुलीचं नाव - पलक
3. आडनाव - करमरकर
4. धातू - कनक
5. फूल - कमळ
6. फळ - फणस
7. झाड - वड, पळस
8. गोड पदार्थ - खरवसाचा
9. वस्तू - कढई
10. पूजा साहित्य - तबक
11. दागिना - नथ
12. हत्यार - करवत
13. पक्षी - बदक
14. प्राणी - अस्वल, मगर
15. नदी - सतेज


3.
उद्देश :- शब्दातील परस्परसंबंध जाणून
              त्यांना क्रमाने लावणे.

■ सूचना :- हा खेळ दोन गटांत किंवा दोन
                दोन

(१) झाड  - कळी   -  फूल   - फळ.

(२) फूल  -  मधमाशी - पोळे  - मध.

(३) बीज   - अंकुर   - रोप   -  झाड.

(४) कापूस - सूत   -  कापड  - वस्त्र.

(५) बांबू   -  लगदा   - कारखाना - कागद.

(६) दूध   -  दही     -  लोणी   -  तूप.

(७) झाड   - चिक   - रबर   -  चेंडू.

(८) सुरवंट  - कोश  - रेशीम  - कापड.

(९) समुद्र  - वाफ   - ढग  -  पाऊस

(१०) भुईमूग   - शेंगदाणे  - घाणा  - तेल


No comments:

Post a Comment

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...