० - शून्यातून विश्व उभे करणे, शून्यात नजर लावून बसणे
०.५ - अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
१ - एकाहून एक सरस, एक हाती जिंकुन देणे,एक खांबी तंबू, एक से भले दो
१.२५ - झाकली मूठ सव्वा लाखाची
१.५ - दीड शहाणा, दीड दमडीचीही किंमत नसणे
१.७५ - औट घटकेचा राजा
२ - दोन हात करणे, दोन डगरींवर पाय, दोनाचे चार हात करणे, स्वर्ग दोन बोटे उरणे, दोन घडीचा डाव
३ - तीन तिघाडा काम बिघाडा, तेरड्याचा रंग तीन दिवस, तीन तेरा वाजणे, तिन्ही त्रिकाळ
४ - चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे, चारी मुंड्या चीत करणे, चतुर्भुज होणे ,चार हात करणे
५ - पाचवीला पुजणे, पांचामुखी परमेश्वर
६ - षष्ठी करणे, षडाष्टक योग असणे
७ - सात मजली हास्य, साता जन्माची साथ, साडेसाती लागणे
९ - नाकी नऊ येणे, नव्याचे नऊ दिवस
१० - दशांगुळे वर उरणे, दहा तोंडानी बोलणे, दहावा ग्रह (जावई) / जामातो दशम ग्रहम।
११ - ११ नंबरच्या बसने जाणे (पायी जाणे), नौ दो ग्यारह होना
१२ - बारा गावचे पाणी प्यालेला, १२ बलुतेदार, सब घोडे बारा टक्के
१३ - दुष्काळात तेरावा महिना, तीन तेरा वाजणे
१४ - चौदावे रत्न दाखवणे, चौदा विद्या
१६ - सोळा आणे खरे, सोळावं वरीस धोक्याचं
१८ - अठरा विश्वे दारिद्र्य, अठरापगड जातीचा समाज १९-२० - उन्नीस बीस का फरक
२५ - गद्धे पंचविशी
२८ - युगे अट्ठावीस विटेवरी उभा
३२ - बत्तिशी दाखवणे/ खरी करणे / पाडणे
३६ - छत्तीसचा आकडा असणे
४० - डोळ्यावर चाळीशी येणे (चष्मा लागणे)
४२ - बेचाळीस पिढ्यांचे कल्याण करणे / उद्धार करणे
५२ - बावनकशी सोने
५५ - पहिले पाढे पंचावन्न
५६ - छपन्न मुली उभ्या करणे
६० - साठी बुद्धी नाठी
६४ - चौसष्ट घरांचा राजा (बुद्धीबळपटु)
६५ - पासष्टावी कला (जाहिरातीची कला)
८४ - चॊ-यांशी लक्ष योनी
१०० - शंभरी भरणे, जीवेत शरदः शतम I
शेरास सव्वाशेर होणे
लाखाचे बारा हजार
१०५ -वयं पंचाधिकम शतम
आठशे खिडक्या नऊशे दारं…!
१७०० - नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं
१७६० - सतराशे साठ वेळा सांगणे
Tuesday, 5 December 2017
क्रमांकांवर आधारित म्हणी / वाक्प्रचार / शब्दप्रयोग
Subscribe to:
Post Comments (Atom)
डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय
1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...
-
1. Lion – Den – (सिंह – गुहा) 2. Dog – Kennel – (कुत्रा – कुत्र्याचे घर/केनेल) 3. Mouse – Hole – (उंदीर – बीळ) 4. Sheep – Pen – (मे...
-
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा. 2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर. 3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक...
-
A. लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३...
No comments:
Post a Comment