1. प पा ती
2.ना ये अं वा
3.ता ज़ा भां ल न
4.ल तों मो घा
5.हा कां आ क
6.ग घ खा
7.अ ते मा
8.दी खा अ
9.घ मा च
10.श श मा
11.ए ना ध भा चिं
12.आ बी ना
13.वा लं गा श
15.मा हा को
16.स धा कु
17.घो मै ज आ
18.कु शे न घा त वा ते वा
19.गा गु च का
20. ना सो हा क वा
वरील म्हणी👆
1 पळसाला पाने तीन.
2 नाचता येईना अंगण वाकडे.
3 ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
4 लहान तोंडी मोठा घास.
5 हातच्या कांकणाला आरसा कशाला.
6 गर्वाचे घर खाली.
7 अती तेथे माती.
8 दिव्याखाली अंधार.
9 घरोघरी मातीच्या चुली.
10 शहाण्याला शब्दांचा मार.
11 एक ना धड भाराभर चिंध्या.
12 आयत्या बिळात नागोबा.
13 वासरात लंगडी गाय शहाणी.
15 माकडाच्या हाती कोलीत.
16 सरड्याची धाव कुंफणापर्यंत.
17 घोडे मैदान जवळच असणे.
18 कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.
19 गाढवाला गुळाची चवच काय!
20.नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा.
No comments:
Post a Comment