Monday, 4 December 2017

शब्द समूहाबद्दल एक शब्द

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा -अष्टावधानी 
अनेक केळ्यांचा समूह - घड 
अनेक गुरांचा समूह - कळप 
द्राक्षांचा समूह - घोस 
अनेक फुलांचा समूह - गुच्छ 
अनेक माणसांचा समूह - जमाव 
काम करण्यास टाळंटाळ करणारा - कामचोर 
अस्वलाचा खेळ करणारा - दरवेशी
ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक 
ईश्वर आहे असे न मानणारा - नास्तिक 
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा  
ऐकायला येत नाही असा - बहिरा 
ऐकायला व बोलायला येत नाही असा - मूकबधीर 
कथा सांगणारा - कथेकरी 
कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य 
कपडे धुण्याचे काम करणारा - धोबी 
कपडे शिवण्याचे काम करणारा - शिंपी 
कष्ट करून जगणारा - श्रमजीवी
कमी आयुष्य असणारा - अल्पायुषी
कर्तव्य तत्परतेने पार पडणारा - कर्तव्यदक्ष  
कापड विणणारा - विणकर 
कादंबरी लिहिणारा लेखक - कादंबरीकार 
कविता करणारी - कवयित्री 
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत - तट 
केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा - स्वार्थी 
केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ 
केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न
कैदी ठेवण्याची जागा - तुरुंग  
कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल - क्रांती 
खूप दानधर्म करणारा - दानशूर 
खूप आयुष्य असणारा - दीर्घायुषी 
खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी 
गुरे राखणारा - गुराखी 
घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित 
घरापुढील मोकळी जागा - अंगण 
घरे बांधणारा - गवंडी 
चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुक्लपक्ष 
चित्रे काढणारा - चित्रकार 
जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर  
जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार 
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे - आभास 
जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा - दुकान
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते - अवर्णनीय 
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते - अविस्मरणीय 
ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू 
ज्याला आईवडील नाहीत असा - अनाथ, पोरका
ज्याला मरण नाही असा - अमर
ठराविक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे - नियतकालिक 
एकत्र येतात ती जागा - तिठा   
झाडांची निगा राखणारा - माळी 
तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला - अतिथी 
दगडावर कोरलेले लेख - शिलालेख 
दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार 
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक 
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक 
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक 
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक 
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक 
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे -  षण्मासिक 
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे - वार्षिक 
दारावरील पहारेकरी - द्वारपाल, दरवान 
दुष्काळात सापडलेले - दुष्काळग्रस्त 
दुसऱ्यावर अवलंबून असणारा - परावलंबी 
दुसऱ्यावर उपकार करणारा - परोपकारी
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा - वृत्तनिवेदक  
देशाची सेवा करणारा - देशसेवक 
देवापुढे सतत जळणारा दिवा - नंदादीप 
दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम
धान्य साठवण्याची जागा - कोठार 
नदीची सुरवात होते ती जागा - उगम
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - अभिनेता / नट
नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा 
पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण 
पायात चपला वा बूट न घालता चालणारा - अनवाणी
पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
पालन करणारा - पालक
पायी चालणारा - पादचारी 
पुरामुळे नुकसान झालेला - पूरग्रस्त
पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व, अपूर्व  
मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त, अन्नछत्र 
बसगाड्या थांबण्याची जागा - बसस्थानक 
रेल्वे गाड्या थांबण्याची जागा - रेल्वेस्थानक 
बातमी आणून देणारा/देणारी - वार्ताहर 
बोलता येत नाही असा - मुका
भाषण ऐकणारा - श्रोता 
भाषण करणारा - वक्ता  
माकडाचा खेळ करणारा - मदारी 
मातीची भांडी करणारा - कुंभार 
मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय 
रणांगणावर आलेले मरण - वीरमरण 
रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका 
लग्नासाठी जमलेले लोक - वर्‍हाडी 
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत - आबालवृद्ध 
लाकूडकाम दरणारा - सुतार
लाज नाही असा - निर्लज्ज 
लागत नाही असा - अथांग 
वाद्य वाजवणारा - वादक
वाडवडिलांनी मिळवलेली - वडिलोपार्जित 
विनामुल्य पाणी मिळण्याची जागा - पाणपोई 
विमान चालवणारा - वैमानिक 
व्याख्यान देणारा - व्याख्याता 
शत्रूकडील बातमी काढणारा - हेर 
शत्रूला सामील झालेला - फितूर 
शेती करणारा - शेतकरी
शोध लावणारा - संशोधक 
श्रमांवर जगणारा - श्रमजीवी 
सतत काम करणारा - दीर्घोद्योगी 
स्तुती गाणारा - भाट 
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष - कल्पवृक्ष 
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय - कामधेनू 
स्वर्गातील इंद्राची बाग - नंदनवन 
स्वतः श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ 
स्वतःचा स्वार्थ न पाहणारा - निःस्वार्थी
संकटे दूर करणारा - विघ्नहर्ता 
सूर्य उगवण्याची घटना - सूर्योदय 
सूर्य मावळण्याची घटना - सूर्यास्त 
सोन्याचांदीचे दागिने करणारा - सोनार
हत्तीला काबूत ठेवणारा - माहूत  
हाताच्या बोटात घालायचं दागिना - अंगठी 
होडी चालवणारा - नावाडी

No comments:

Post a Comment

डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय

1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.  2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्य...