१]प्रश्न असा आहे की उत्तर काय :-दिशा
२]एवढस कार्टं घर कसं राखतं :-कुलूप
३]इथेच आहे पण दिसत नाही :-वारा
४]दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी :-डोळे
५]पांढरं पातेल पिवळा भात :-अंडं
६]तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला :-लवंग
७]सुपभर लाह्या त्यात एक रुपया :-चंद्र आणि चांदण्या
८]हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली :-भेंडी
९]तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई :-चूल आणि तवा
१०]तीनजण वाढायला बाराजण जेवायला :-घड्याळ
११]पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब :- कणीस
१२]पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,कात नाही, चुना नाही, तरी तोंड कसं रंगलं:- :-पोपट
१३] पुरूष असून पर्स वापरतो,वेडा नसून कागद फाडतो :-कंडक्टर/ बस वाहक
No comments:
Post a Comment